पंढरपूर // प्रतिनिधी
राज्यात कोरोना सारख्या महा विषाणुचा फैलाव जोरात सुरु आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील नागरिक करत आहेत, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जनता कर्फ्यू व लॉकडान सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले असून त्याचा परिणाम *रिक्षा* चालवणाऱ्या बांधवावरती खुप होत आहे.रोजचा दैनंदीन घरखर्च,शिक्षणखर्च,रिक्षा रिक्षाचा टॅक्स,इन्सुरन,आणि गाडी पांसिग सुध्दा करायला साधे पैसे सुध्दा नाही.रिक्षाचे हप्ते भरणे सुधा
अवघड झाले आहे तरी सामान्य रिक्षा बांधवांना सरकारने योग्य पद्धतीने न्याय द्यावा.त्यात २५दिवस रिक्षा व्यवसाय बंद करण्यात आला आहे. त्यामुळे रिक्षा चालक मालक यांचे जीवन जगने मुश्किल झाले आहे. त्यासाठी सरकारने आम्हाला *आंध्रप्रदेश सरकाराच्या धरतीवर वाएसआर वाहन मित्र योजने अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालक व मालक* बांधवांना आर्थिक सहाय्य मदत करावी. सरकारने सर्व स्तरांतील घटकांना न्याय देण्याचे कार्य केले आहे.सर्व नोकरवर्ग बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या वर्गासही मदत जाहीर केली आहे.
कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितले की कोणाचीही वेतन कपात केली जाणार नाही.त्याच धर्तीवर रिक्षा चालक व मालक बांधवांना आर्थिक सहाय्य मदत करावी.रिक्षा चालक मालक यांच्यावरती अन्याय होऊ देवू नये. त्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने रिक्षा चालक मालक यांना आर्थिक सहाय्य मदत जाहीर करावी. अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी केली आहे.महाविकास आघाडी सरकारला कळकळीची विनंती आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.