राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१व्या वर्धापनदिनानिमित्त जैनवाडी येथे रक्तदान शिबिर संपन्न.



सोलापूर प्रतिनिधी:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २१व्या वर्धापनदिनानिमित्त तालुकाध्यक्ष  ॲड.दिपक दामोदर पवार यांनी  जैनवाडी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.यावेळी १२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.तसेच महीला राष्ट्रवादीच्या वतीने आरोग्यसेविका व आशा स्वयंसेविका यांना सन्मानपत्र देण्यात आले.शिबिराचे उद्घाटन जिल्हा उपाध्यक्ष युवराजदादा पाटील यांनी केले.

यावेळी  जिल्हा कार्याध्यक्ष राजुबापु पाटील तालुकाध्यक्ष दिपक पवार , बाळासाहेब पाटील , विलासनाना देठे ,अनिता पवार,बाळासाहेब जाधव,संतोष नाईकनवरे ,सुग्रिव कोळी,अरुण आसबे,रणजित लामकाने,दिलीप साळुंखे ,कृष्णा माळी,धनंजय बागल,अमोल नागणे,प्रविण भोसले,प्रकाश देठे,मंगेश देठे,हणमंत सोनवले,महादेव लिंगडे व पदाधिकारी उपस्थित होते..यासाठी पंढरपूर ब्लड बँक पंढरपूर यांनी चांगले नियोजन व सहकार्य केले. यावेळी सर्व युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या    आवाहनाला सामाजिक बांधिलकी म्हणून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget