पंढरपूर // प्रतिनिधी
मनसेचे प्रदेश सरचिटणीस मा. दिलीप (बापु) धोत्रे यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा!
महिला बचत गटांनी वर्षानुवर्षे मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेत असतात व ते वेळोवेळी हाप्ते भरून परत फेड ही करत असतात कर्ज देताना मायक्रो फायनान्स कंपन्यांनी जे कर्ज घेताना पाॅलिसि फिच्या नावाखाली जे हजारो रूपये घेतात व त्या पाॅलिसि काढल्याचे कागदपत्रे ही देत नाहीत लाॅकडाऊन काळामध्ये सर्वांनबरोबर महिला बचत गटाचे ही खुप नुकसान झाले आहे अशामध्ये कर्जाबरोबर काढलेल्या पाॅलिसीच्या आधारे महिलांना दिलासा द्यायला पाहिजे होता परंतू तसे झाले नाही ही महिला बचत गटाची फसवूनक आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन काळामध्ये ज्या महिला बचत गटाचे कर्ज होते त्या कर्जाच्या हाप्त्यासाठी मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्मचारी तगादा लावत आहेत केंद्र सरकारने पॅकेज जाहीर करून जे काही कर्जाचे हाप्ते असतील ते सहा महिने मागू नये असे सांगितले तरी मायक्रो फायनान्स कंपन्यांन्यांचे कर्मचारी येऊन बचत गटातील महिलांना हाप्त्यासाठी तगादा लावून वसुली करत आहे ती थांबवावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्मान सेनेकडून योग्यतो धडा शिकवू असा महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे प्रदेश सरचिटणीस मा. दिलीप( बापू)धोत्रे यांनी इशारा दिला आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.