पांडुरंग साखर कारखान्याचे ऊस तोडणी वहातुक करार सुरु




पंढरपूर // प्रतिनिधी 

श्रीपुर (ता.माळशिरस)येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२१ साठी ऊस तोडणी वहातुक करार पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन करुन सोशल डिस्टन्स पाळत शुभारंभ करण्यात आला.

अधिक माहिती देताना कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, चेअरमन सुधाकरपंत परिचारक ,मार्गदर्शक  आमदार प्रशांत परिचारक व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची यशस्वी घौडदौड सुरू असून  गळीत हंगाम २०२१ करिता  सुमारे ९ लाख मे. टन उसाची उपलब्धता असणार आहे त्या अनुषंगाने ३५० ट्रेक्टर व ट्रक,१५० बजाट, ८ हार्वेस्टिंग मशीन , २०० बैलगाडीचे नियोजन करुन करार करणार आहोत. मागील हंगामातील तोडणी वाहतुकीचे सर्व बिले अदा केली आहेत त्याचे कमीशन व डिपॉजिट लवकरच अदा करणार आहोत. त्याच बरोबर उस पुरवठा केलेल्या  सभासद शेतकरी यांचे ८४ टक्के एफआरपीची रक्कम अदा केली आहे. उर्वरित राहिलेली रक्कम ठरवलेल्या धोरणानुसार अदा करणार आहोत.

 कारखान्याने मागील गळीत हंगामामध्ये ७ लाख एकशे एक मे.टन. ऊस गाळप करून सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साखर उतारा मिळालेला आहे. येणाऱ्या पुढील गळीत हंगामामध्ये 9 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट असून जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा राहण्याची परंपरा कायम ठेवण्यात प्रयत्नशील आहेत.

पांडुरंग कारखाना ऊस तोडणी यंत्रणा, कर्मचारी यांच्या करिता सातत्याने अडचणीच्या वेळी मदत करत असतो, गरजेच्या वेळेला विमासंरक्षण ,पाणी, विद्युत पुरवठा , आरोग्य तपासणी  मोफत अशी  विविध मदत वेळोवेळी करत असतो.

याप्रसंगी केन मॅनेजर संतोष  कुमठेकर, उस पुरवठा अधिकारी दादा देशमुख,राम पाटील, ॲग्री ओव्हरसियर  चंद्रकांत कुदळे अनिल मासाळ, वाहतूक ठेकेदार ज्ञानोबा नाईकनवरे पट कुरोली, हनुमंत यमगर करोळे, दिलीप बेलदर जांभूड, विष्णू अहिरे बार्डी,संजय पिंजारे भोसे, शंकर ठोंबरे  करकंब आदी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget