पंढरपूर // प्रतिनिधी
नागरी हिवताप योजना पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर या कार्यालयमार्फत पंढरपूर शहरात किटकजन्य रोग नियंत्रण व कोरोना प्रतिबंधासाठी जंतूनाशक फवारणी/डासअळी नाशक फवारणी दैनंदिन केली जाते. तसेच हिवताप विभागामार्फत आढळून आलेल्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये किटकजन्य रोग नियंत्रणासाठी टेमीफॉसचे द्रावण टाकण्यात येते.
सध्या पंढरपूर शहर व परिसरात पावसाचे आगमन झालेले असून पाणी साठून तयार होणाऱ्या डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करणे, डासअळी नाशक फवारणी करणे इत्यादी प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. तरी, पंढरपूर शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सर्व नागरिकांनी आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. आपल्या घराभोवती व परिसरात फुटके भांडी, भंगार, टायर इत्यादी ठिकाणी पाणी साठून राहणार नाही व डासोत्पत्ती होणार नाही त्यान्वये डेंगू/हिवताप/चिकनगुन्या इत्यादी आजार होणार नाहीत. याबाबत दक्षता घ्यावी.
पंढरपूर नगरपरिषदेमार्फत माहे-मे महिन्यामध्ये कोरोना प्रतिबंधासाठी जंतूनाशक फवारणी व डासअळी नाशक फवारणी ७,५३,००० स्के.मीटर भागावर करण्यात आली तसेच कंटेनर सर्वेक्षणामध्ये २३९५ घरामधील ४६९८ कंटेनरची तपासणी केली असता १२८ कंटेनर दुषित आढळून आलेले आहेत.तरी पंढरपूर नागरिकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, कोरोना नियंत्रणासाठी प्रत्येक नागरिकांना मास्क चा वापर करावा, वांरवार हात धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच किटकजन्य रोग नियंत्रणासाठी, मच्छरदाणी वापर करावा, डासापासून रक्षणासाठी कॉईल, क्रिम, इत्यादीचां वापर करावा घरातील खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, व्हेंट पाईपला जाळी बसवावी जेणे करून हिवताप/डेंगू/चिकनगुन्या हे आजार टाळता येतील.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.