सोलापूर // प्रतिनिधी
मार्च महिन्यात केंद्र व राज्यसरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अनेक वृत्तपत्रांची काही काही दिवस छपाई व वितरण थांबविण्यात आली होती.अचानक आलेल्या या संकटामुळे वृत्तपत्र स्टाल धारक विक्रेते व घरोघरी वाटप करणारे विक्रेते यांना खूप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे.व्यवसाय पूर्णपणे बंद होते तर आता व्यवसाय ५० टक्क्यावर आला आहे. त्यामुळे या वृत्तपत्र विक्रेत्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी अशा आशयाची मागणी पंढरपूर शहर राष्ट्रवादी कॉग्रेसने प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
हे निवेदन देताना राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर उपाध्यक्ष सचिन कदम,उपाध्यक्ष गिरीश चाकोते हे उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.