सोलापूर // प्रतिनिधी
सन 2019 आले आलेल्या भीमा नदीच्या महापुरा मध्ये ते पंढरपूर तालुक्यातील अनेक गोरगरीब शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते त्यामध्ये बऱ्याच अंशी सर्वच पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरवली येथील शेतकऱ्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यानंतर पंचनामा होऊन सुद्धा सात ते आठ महिन्याचा कालावधी झाला असून या सर्व शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचे नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामुळे येथील शेतकरी फार मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेला आहे.
याबाबतीत बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) जवळेकर यांनी पंढरपूर येथील मा. प्रांताधिकारी यांना या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून निवेदन सादर केले आहे.
हे निवेदन सादर करताना त्यांनी यामध्ये आम्हाला सर्व शेतकर्यांना शासनाकडून लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनामध्ये केली आहे.
हे निवेदन त्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याबरोबरच पंढरपूर येथील तहसीलदार व पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे पोलिस निरीक्षकांना माहितीसाठी सादर केले आहे.
या निवेदनावरती बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांच्याबरोबरच हरिदास पाटील गोपाळ नाईक नवरे सुरेश चव्हाण आदींच्या सह्या आहेत.
याबाबत ज्ञानेश्वर माऊली जवळकर यांनी सांगितले की सर्व पूरग्रस्त शेतकर्यांना शासनाकडून लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी अशी आमची शासनाकडे विनंती आहे

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.