पंढरपूर // प्रतिनिधी
वर्षानुवर्षे लाखो वारक-याच्या उपस्थितीत होणारा श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा शुक्रवारी (दि. 12) कोरोनाच्या पार्श्वसभूमीवर अवघ्या पन्नास लोकांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. देऊळवाड्याचे दरवाजे बंद ठेवून होणारा हा सोहळा वारकर्यांाच्या मनाला मात्र हुरहुर लावणारा ठरणार आहे.
संत तुकाराम महाराजांचा 335 वा पालखी प्रस्थान सोहळा आज होत आहे. संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यावर्षी शासनाच्या सूचनेनुसार 50 लोकांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे. संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विश्वजस्त संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांनी सोहळ्याच्या तयारीची माहिती दिली.
या सोहळ्याला वारकरी भाविक उपस्थित राहणार नसल्याने गुरुवारी (दि.11) संपूर्ण गावात सामान्य वातावरण होते. टाळ-मृदुंगाचा आवाज घुमत नव्हता, भजन-कीर्तनाचे मधुर स्वर नव्हते. इंद्रायणी दुथडी भरून वाहत होती. पण वारकर्यां विना घाट मात्र सुने होते. सोहळ्याच्या पार्श्वच?भूमीवर गुरुवारी सकाळी संपूर्ण देऊळवाड्याची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. क्रिएटिव्ह इंडस्ट्रियल हायटेक सर्व्हिसेस या संस्थेचे विजय बोत्रे आणि रोशन मराठे यांनी सहा कर्मचार्यां च्या मदतीने हे काम पूर्ण केले.
संस्थानच्या वतीने प्रस्थान सोहळ्याचा दिवसभराचा कार्यक्रम दुपारी जाहीर करण्यात आला. कडक निर्बंध असल्यामुळे सोहळ्यात माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षी सेवेकर्यां च्या संख्येत कपात करण्यात आली आहे. मुख्य चोपदार, शिंगी, पालखीचे भोई, जरीपटका, गरूडटक्के आदींसाठी प्रमुख सेवेकर्यांखना सोहळ्यास उपस्थित राहता येणार आहे. स्थानिकांनादेखील या सोहळ्यात सहभागी होता येणार नाही किंबहुना पादुकांचे दर्शनही घेता येणार नाही.
पोलिसांच्या वतीने देहूकडे येणारे सर्व रस्ते परगावच्या वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. या काळात गावात येणार्याठ प्रत्येकाची कसून तपासणी करण्यात येणार आहे. मंदिरात जाताना प्रत्येकाला वैद्यकीय तपासणी करूनच प्रवेश दिला जाणार आहे.
पालखी प्रस्थान कार्यक्रम खालीलप्रमाणे
पहाटे 4.00 वा. मुख्य मंदिरात काकडा आरती व महापूजा.
पहाटे 4.30 वा. शाळा मंदिरात महापूजा.
पहाटे 5.00 वा. वैकुंठस्थान मंदिरात महापूजा.
सकाळी 6.00 वा. पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधीचे पूजन.
सकाळी 9.00 पासून घोडेकर सराफ सेवेकर्यां कडून मंदिरातच पादुकांना चांदीचा मुलामा देण्यात येईल.
सकाळी 10.30 च्या सुमारास मसलेकर मंडळींकडून पादुका डोक्यावर घेऊन पांडुरंगाची भेट कळविण्यात येईल. त्यानंतर पादुकांचे भजनी मंडपात आगमन.
सकाळी 11.30 वा. सेवेकरी, दिंडीवाले, मसलेकर, पालखीचे भोई, चोपदार, शिंगी, अब्दागिरी, जरीपटका, गरूडटक्के आदी सेवा बजावणार्यां सेवेकर्यांाना नारळ प्रसाद देऊन सन्मान.
दुपारी 2.00 वा. मुख्य प्रस्थान सोहळ्याची सुरुवात.
प्रस्थान सोहळ्यानंतर मंदिर प्रदक्षिणा, नियमांचे अभंग व पुन्हा पादुकांचे मंदिरात आगमन. त्यानंतर समाज आरती.
सायंकाळी 7 ते 9 कीर्तन सेवा.
रात्री 11.00 वा. शेजआरती, त्यानंतर जागर.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.