सांगोला शहरातील सर्व नाले,गटारी व नागरी गटारी साफ सफाई करावी



पंढरपूर // प्रतिनिधी


सांगोल  शहरातील सर्व नाले गटारी गटारी नागरी आणि सार्वजनीक गटारींची मान्सून पर्व साफ -सफाई करण्यात यावी.उन्हाळा संपत आला आहे तसेच लवकरच पावसळ्यास सुरवात होत आहे.याचे चिन्हे दिसत आहेत.तसेच आपल्या मोहोळ शहरातील मनपाकडून दरवर्षी मानसुन सुरू व पुर्व शहरातील सर्व नाले नागरी गटारांची साफ सफाई करण्यात येत असते.परंतू तरी देखील नगरपरिषदने साफ सफाई व स्वच्छता करून घ्याव्यात.कारण सांगोला  शहरातील काही भागातील गटारी व उघड्या गटारी तुबंल्या जात आहेत.त्यावर जनतंतू नाशिके औषध  फवारणी करण्यात यावी.सध्या संपूर्ण देशात कोरोना या साथ विकाराचा फैलाव झाला आहे.व त्यामुळे आपले मोहोळ रेड झोनमध्ये आले आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ हा जिवजंतू,डास,मच्छर,चिलेट या जिवजंतूचा जनन व प्रजननाचा काळ पावसाळ्याच्या सुरुवातीला सुरू होतो.या सदरील जिवजंतूचा अधिवास हा नाले गटारी नागरी गटारी,तसेच पाण्याच्या डबक्यांच्या ठिकाणी सर्वाधिक असतो.पावसाळ्याच्या सुरुवातीला दरम्यानच्या काळात डेंग्यु,मलेरिया ताप,सर्दी,खोकला व तस्तम विकारांचा फैलाव होताना दिसून येतो.त्यामुळे सांगोला शहरातील सर्व नाले नागरी गटारीची साफ सफाई करून घेण्यात याव्यात.तसेच सांगोला  शहरातील व काही या भागातील खराब रस्ते दुरूस्ती करून घ्यावे.अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने सांगोला  नगरपरिषदकडे करण्यात आली आहे.तरी सांगोला मुख्याधिकारी  साहेब यांनी जातीने लक्ष घालून सांगोला मधील सामान्य नागरिकांना दिलासा देण्यात यावा.असे ही निवेदनात म्हटले आहे.यावेळी निवेदन घेताना सांगोला नगरपरिषदचे आरोग्य अधिकारी संजय दौंडे साहेब दिले आहे.यावेळी निवेदन देताना शिवबुध्दचे संस्थापकअध्यक्ष संदिपराजे मुटकुळे,सांगोला शहराध्यक्ष विशाल देशमुख,प्रणव देशमुख,अतुल शिंदे,प्रतिक काळे,इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget