कुर्डूवाडीत सहा तर वळसंगमध्ये एक पाँझिटिव्ह






जिल्ह्यातील 11 पैकी नऊ तालुक्‍यात कोरोनाची लागण झाली आहे. प्रत्येक तालुक्‍यात कोरोनाचे रुग्ण आझळून आले आहेत. मात्र, मंगळवेढा व करमाळा तालुक्‍यात अद्याप एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.

सोलापूर // प्रतिनिधी

कोरोना हळूहळू जिल्ह्यात पाय पसरु लागला आहे. कुर्डुवाडी (ता. माढा) येथे आज सहा तर वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. आज एकूण 80 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 73 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 80 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज आढळून आलेले सातही रुग्ण पुरुष आहेत. कुर्डुवाडी येथील आर. पी. एफ. ऑफीस येथील कार्यालयातील हे सहाही रुग्ण आहेत. वळसंग येथील एक रुग्ण हा सारीचा आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 68 इतकी आहे. आतापर्यंत सहा जण मृत पावले आहेत. त्यापैकी तीन पुरुष तर तीन स्त्रियांचा समावेश आहे. सध्या दोन हजार 983 जणांना होम क्वारंटाईन केले आहे. अद्यापही 71 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून सहा जण बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये पाच पुरुषांचा तर एका स्त्री चा समावेश आहे.

कोरोना बाधितांची तालुकानिहाय संख्या

अक्कलकोट-8, बार्शी-18, माढा-7, माळशिरस-2, मोहोळ-4, उत्तर सोलापूर-2, पंढरपूर-सात, सांगोला-3, दक्षिण सोलापूर-29, एकूण-80.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget