जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दामाजी साखर कारखान्यावर वृक्षारोपण


पंढरपूर // प्रतिनिधी
पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीकोनातून ५ जून हा दिवस ''जागतिक पर्यावरण दिन'' म्हणून साजरा केला जातो। संपूर्ण विश्वातील वाढती लोकसंख्या, दळणवळणातील वाढता पसारा, वाढते औद्योगिकीकरण, त्यापासून निर्माण होणारे प्रदुषणासारखे गंभीर प्रश्न याबाबत सर्वसामान्य लोकामध्ये जनजागृती करण्यासाठी १९७२ सालापासून हा दिवस जागतीक पर्यावरण संवर्धन संस्था या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पुढाकाराने जागतीक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो। 
सदर दिवशी पर्यावरण संरक्षण व संवर्धनाबाबत सर्व जनमानसात जागृती व्हावी व महत्व कळावे यासाठी सद्यपरिस्थितीतील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून तसेच या संदर्भात सरकारने दिलेल्या निर्देशांचे / आदेशांचे / नियमांचे पालन करुन योग्य ती खबरदारी घेवून कारखान्याचे चेअरमन मा।श्री।समाधानदादा आवताडे यांचे मार्गदर्शनानुसार कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला। परिसरातील प्रदुषण कमी होवून शुध्द हवेचा पुरवठा व्हावा या उद्देशाने कारखाना परिसरात पिंपळ, वड, कडूलिंब, आंबा इ। प्रकारची १०० झाडे लावून पर्यावरण संवर्धन मोहिमेत सहभाग नोंदविला असलेची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री।झुंजार लक्ष्मण आसबे यांनी दिली।  सदर प्रसंगी कारखान्याचे वर्क्स मùनेजर श्री। सुहास शिनगारे, शेती अधिकारी श्री।रमेश पवार, असि।स्टोअरकिपर श्री।उत्तम भुसे, असि।लेबर आùफिसर श्री।आप्पासाहेब शिनगारे, मùन्यु केमिस्ट श्री।देशपांडे, इन्व्हायरमेंट इंजिनिअर श्री।ताम्हाणे, फिल्डमन संजय इंगळे यांचेसह कर्मचारी उपस्थित होते। 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget