महाराष्ट्र पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न



वृत्तसंस्था // प्रतिनिधी

"पुरस्काराने प्रेरणा मिळते, जोमाने काम करण्याची ऊर्जा त्यातून तयार होते. मात्र पुरस्काराने अहंकार जागृत न होता नम्रपणा निर्माण होतो तेव्हाच तो पुरस्कार खऱ्या अर्थाने सार्थकी लागतो" अशी भावना पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार अभिजीत पतकी यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र पत्रकार सुरक्षा समिती आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष श्री यशवंत पवार हे होते. प्रारंभी "दर्पण"कार आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
महाराष्ट्र पत्रकार सुरक्षा समितीच्यावतीने सामाजिक, कृषी, पत्रकारिता, वैद्यकीय आदी क्षेत्रात निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तिंना दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
महाराष्ट्र पत्रकार सुरक्षा समितीच्या या कौतुकास्पद कार्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार विश्वनाथ चव्हाण यांनी केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget