महाराष्ट्र राज्य पञकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पञकार पुरस्कार वितरण


वृत्तसंस्था // प्रतिनिधी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी  आई तुळजा भवानी मातेच्या पुण्य पावन नगरीत दि.२६ शुक्रवार रोजी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने देण्यात येणारा 2020 चा आदर्श पत्रकार पुरस्कार जानेवारीमध्ये जाहीर झालेला पुरस्कार  संसर्गजन्य कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने सोशल डिस्टन्स पाळून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते आज सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले
ठराविक लोकांच्या उपस्थित शिवाजी चौक येथील शासकीय विश्राम गृह येथे  पुरस्कार वितरण  संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य पञकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष मा.यशवंत पवार यांच्या हस्ते आदर्श पञकार पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले. या मध्ये आदर्श पञकार म्हणून  तुळजापुर शहरातील धनराज न्युज च्या वृतनिवेदिका किरण चौधरी, पञकार सचिन ताकमोघे,राहुल कोळी, कुमार नाईकवाडी, नळदुर्ग चे आयुब शेख इटकळ चे दिनेश सलगरे
प्रविन राठोड, कलीम शेख आदीसह पञकारांना सन्मान चिन्ह व प्रमाण पञ देवुन गौरविण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पवार,अमिर शेख, रूपेश डोलरे, आशा वाघ आदी उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget