सोलापुरातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकडेवारीत घोळच घोळ


सोलापूर // प्रतिनिधी

सोलापुरात कोरोनाने मृत्यू झालेल्या आकडेवारीतील घोळ  उघडकीस आल्यानंतर आता पॉझिटिव्ह रुग्णांच्या बाबतीत अशा तक्रारी वाढल्या आहेत. सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेकडून एकाच रुग्णाचे दोनदा अहवाल येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

भवानीपेठेतील एका नगरसेवकाच्या पत्नीची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली. अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या रुग्णालयात उपचार घेत असताना पुन्हा चार दिवसांनी आरोग्य खात्याचे कर्मचारी घरी आले व तुमच्या घरातील दोघांंचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, उपचारास न्यावे लागेल, असे सांगू लागले.

त्यावेळी घरातील मंडळींनी दोन्ही रुग्ण यापूर्वीच रुग्णालयात अ‍ॅडमिट असल्याचे सांगितले. यापूर्वीच अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा नवा अहवाल कोठून आला, अशी त्यांच्या घरच्यांनी विचारणा केल्यावर कर्मचारी आल्या पावली परतले आहेत.

नातेवाईकांना मृतदेह देण्यास होतेय घाई

शाहीर वस्तीतील एका किराणा दुकानदाराचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यांना ज्या रुग्णालयात उपचारास दाखल केले होते, तेथील प्रशासनाने नातेवाईकांना मृतदेह नेण्याचा आग्रह केला. यावर एका नगरसेवकाने रिपोर्ट आला का अशी विचारणा केली, त्यावर अहवाल अद्याप आलेला नाही, असे सांगून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात न्यायचा आहे, अशी सारवासारव त्या रुग्णालयातील कर्मचाºयांनी केली. त्यावर त्या नगरसेवकाने समन्वय अधिकारी पांडे यांच्याशी संपर्क साधून अहवालाविषयी चौकशी केली. त्यानंतर त्या किराणा दुकानदाराचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.

जिल्हाधिकारी म्हणाले पाहतो

मृत्यूच्या घोळानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची यादी दुबार होत असल्याचा प्रकार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निदर्शनाला आणण्यात आला. त्यांनी या प्रकरणात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना लक्ष घालण्याची सूचना केली आहे. त्यावर शंभरकर यांनी यात नेमके काय घडले आहे हे पाहतो, असे म्हटले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget