एमपीएससी विद्यार्थीची वयाची मुदत संपणा-या विद्यार्थीना पुढील वर्षी परिक्षांना बसू द्यावेत:- शिवबुध्दचे संदिप मुटकुळे


पंढरपूर // प्रतिनिधी

एमपीएससी विद्यार्थीची वयाची मुदत संपणा-या उमेदवारांना पुढील वर्षी परिक्षांना बसू देण्यात याव.
कोरोनाच्या संकटामुळे उध्दभवलेल्या परिस्थितीत यावर्षी सरकारी नोकरभरती होणार नाही अशी स्थिती आहे.याचा फटका एमपीएससी तयारी करणा-या व यावर्षी वयाची मुदत संपणा-या उमेदवारांना बसणार आहे. यामुळे अनेक पात्र व लायक उमेदवार शासनाच्या सेवेत येऊ शकणार नाहीत.शिवाय त्यांचे श्रम वाया जातील.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाचे हे अभूतपूर्व संकट लक्षात घेता या उमेदवारांना वयाची मर्यादा वाढवून एमपीएससीच्या पुढील परिक्षासाठी बसू देण्यात यावं
दरम्यान एमपीएससीच्या सर्वत्र परिक्षा लांबणीवर पडल्या आहेत.राज्यातील कोरोनाचं संक्रमण वाढतच राहिल्यास परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिक्षेसाठी वयाची शेवटची मुदत असलेल्या विद्यार्थीमध्ये यामुळं भितीचं वातावरण पसरल्याचं पहायला मिळतंय त्यामुळे आपण मायाबाप सरकारने एमपीएससी विद्यार्थी न्याय देण्याचे काम करावे अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget