पंढरपूर // प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी अॅड. दीपक दामोदर पवार तर शहराध्यक्षपदी सुधीर शिवाजीराव भोसले यांची आज फेरनिवड करण्यात आली. त्यांनी निवडीचे पत्र सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे व कार्याध्यक्ष उमेश दादा पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव लतीफ तांबोळी, खजिनदार राजेंद्र हजारे, मा. उपसभापती मानाजी माने उपस्थित होते.
गेल्या तीन वर्षापासून पक्षाध्यक्ष लोकनेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शन आणि पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यात आली व युवकांनी नवीन फळी पक्षामध्ये घेण्यात आली व त्यामुळेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये पंढरपूर शहर व ग्रामीण भागातून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना चांगल्या प्रकारे मताधिक्य मिळाले.
त्याची पोहोच पावती म्हणूनच दोघांनाही पुन्हा संधी मिळाली. या निवडणुकीमुळे पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळणार आहे.
आमदार भारत नाना भालके, प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील, जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.