दिलीप धोत्रे यांच्या हस्ते गरीबांना भोजन वाटप.




पंढरपूर,ता.9ः  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन जाहीर केल्यापासून येथील जयभवानी तरुण मंडळाचे अध्यक्ष अरुण भाऊ कोळी यांच्या वतीने गरीब, वृध्द आणि निराधार लोकांना जेवन वाटप केले जाते. गेल्या 80 दिवसांपासून त्यांचा अन्नदानाचा हा उपक्रम सुरु आहे.

मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या हस्ते येथील संत मुक्ताबाई मठा समोर गरीब व गरजू लोकांना भोजनाचे वाटप केले.

पंढरपूर शहरात गरीब, गरजू व निराधार महिला पुरुषांची संख्या जास्त आहे. त्यातच लाॅकडाऊन जाहीर झाल्यापासून अशा लोकांची येथील जयभावानी तरुण मंडळाचे अध्यक्ष अरुण भाऊ कोळी व त्यांच्या मित्र मंडळाने भोजन वाटपाचा उपक्रम राबवला आहे. गेल्या 80 दिवसांपासून त्यांचा उपक्रम सुरु आहे.

त्यांच्या या उपक्रमाचे प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांनी कौतुक केले आहे.

अरुण भाऊ कोळी यांच्या अन्नदान उपक्रमाला मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी भेट देवून त्यांच्या या समाजिक कार्याचे कौतुक केले.

यावेळी श्री. धोत्रे यांच्या हस्ते उपस्थित गरजू व निराधार लोकांना जेवणाचे वाटप केले. यावेळी अरुणभाऊ कोळी, , उपप्रमुख महेश पवार आदींसह मनसेचे  व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget