कोरोनामुळे पहिल्यांदाच आमदाराचा बळी; वाढदिवसालाच ‘या’ आमदाराचा मृत्यू!


वृत्तसंस्था // प्रतिनिधी

देशभरात कोरोनाने हातपाय पसरले असताना दररोज नवनवे आकडे समोर येत आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना मृत्यूचं प्रमाण देखील वाढलं आहे. अशातच डीएमकेचे आमदार जे अनबालागन यांचा आज कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.

काही दिवसांपूर्वी जे अनबालागन यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्यावर एका खासजी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र दरम्यानच्या काळात त्यांची तब्येत खालावल्याने त्यांचा आज मृत्यू झाला आहे.आजच त्यांनी वयाची 61 वर्ष पूर्ण करत 62 व्या वर्षात पदार्पण केलं होतं. आज वाढदिवसादिनी त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कार्यकर्ते आणि हितचिंतकांवर तर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

आमदार जे अनबालागन हे डीएमके पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी लोकांसाठी मोठ्या प्रमाणात मदतकार्य केलं होतं. त्यांनी या मदतकार्यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला होता.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget