पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर शहर व तालुक्यात लाॅकडाऊन व संचारबंदीच्या काळामध्ये सरकारने नागरिकांना गहू तांदूळ,दाळ,दिले होती.पण ती दाळ रेशनकार्ड धारकांना मिळाची नाही. तसेच शासनाने प्रत्येकी ५किलो तांदूळ दिला होता पण शहर व तालुक्यातील रेशन दुकानदारांनी रेशनकार्ड धारकांना पाच किलो न देता 3किलो दिला गेला आहे.मग रेशनकार्ड धारकांचा रहिलेला दोन किलो तांदूळ गेला कोठे यांची सखोल चौकशी करून योग्य ती रेशन दुकानदार यांच्यावर कारवाई करावी.
या रेशन दुकानदारांनी कार्डधारकांची आणि पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांची मोठ्याप्रमाणात फसवणूक केली आहे.असे निवेदन पंढरपूर तहसीलदार वैशाली वाघमारे मॅडम यांना देवून कारवाई करावी अशी मागणी अ.भा.युवक मराठा महासंघ तालुकाध्यक्ष सुमित शिंदे यांनी केली.आपण योग्य कारवाई न केलेल्यास 10/07/2020रोजी तहसिल कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल अशा अशा इशारा दिला आहे.यांची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहिल असे प्रसिद्ध पत्रामध्ये तालुकाध्यक्ष सुमित शिंदे यांनी म्हटले आहे.यावेळी निवेदन देताना शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे,सनी घुले,उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.