जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेण्याची बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी
पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर शहरा लगत कासेगाव हद्दीत असलेल्या उजनी पुनर्वसन यांच्या नावे असलेली एकूण क्षेत्र जवळपास २५ एकर असलेली शेतजमीन बळकावण्याचा डाव काही प्रॉपर्टी डीलर आणि राजकीय वरदहस्त प्राप्त असलेल्या मंडळींनी रचला असून यासाठी शासकीय पातळीवर प्रचंड दबाव आणला जात आहे.सदरची पुनर्वसन जमीन हि अतिशय मोक्याच्या ठिकाणावर असून पंढरपूर शहराचा वाढता विस्तार पाहता या जमिनीची भविष्यात शासकीय प्रयोजनासाठी आवश्यकता भासू शकते.सद्य स्थितीत दुर्लक्षित असलेली हि जमीन पद्धतशीर हस्ते परहस्ते घशात घालण्याचा डाव रचण्यात आला असून या गंभीर प्रकराची तातडीने दखल घ्यावी व या जमिनीच्या हस्तांतराबाबत कायदेशीर प्रतिबंध करावा अशा आशयाची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे प.महाराष्ट्र अध्यक्ष माउली हळणवर यांनी केली आहे.या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी सोलापूर यांनाही पाठविण्यात आली आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.