35 वर्षे प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त पोलीसाला ना बी.पी, ना शुगर, ना कोणताही आजार




काय आहे रहस्य.. निरोप समारंभाला दिले फिट राहण्याचे धडे स.पो.फौ.प्रकाश माने

वृत्तसंस्था // प्रतिनिधी


पोलीस दलात काम करत असताना कामाचा ताण, अपुरी झोप, अवेळी जेवण आणि इतर अनेक समस्यांमुळे पोलीस  दलातील 90 % पोलीसांना कोणता ना कोणता आजार जडलेला असतो. काही पोलीसांचा या कामाच्या ताणामुळे दुर्देवाने मृत्यूही होतो आणि काही पोलीस आपले कर्तव्य सांभाळत आपली मनस्थिती ठीक राहावी या करिता ड्युटी करून व्यायामासाठी थोडा वेळ काढून आपले शरीर सदृढ, निरोगी कसे राहील यासाठी प्रयत्न करतात आणि ते निरोगीही राहतात असेच एक पोलीस कर्मचारी सोलापूर ग्रामीण पोलीस दलात नेमणुकीस आहेत. सोलापूर ग्रामीण पोलीस दलात, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे ला नेमणुकीस असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बजरंग माने हे पोलीस खात्यामध्ये गेले 35 वर्षे सेवा बजावत होते. 35 वर्षे प्रदीर्घ सेवा करून ते 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होऊनही ते पुर्णपणे निरोगी आहेत, ना त्यांना बीपी चा त्रास आहे, ना शुगर चा त्रास. सेवानिवृत्त निरोप समारंभ वेळी त्यांनी पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांना त्यांचे फिट राहण्याचे रहस्य काय आहे हे पटवून देत दररोज न चुकता व्यायाम केलाच पाहिजे असे सांगून व्यायामाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच जड आहार न करता योग्य आहार घेऊन दररोज एक सफरचंद, बदाम, पिस्ता खाण्याचा सल्लाही त्यांनी दिला. तसेच त्यांनी मी सेवानिवृत्त झालो असून आता मला वेळचवेळ असून पोलीस दलातील प्रत्येक पोलीस फिट राहावा, निरोगी राहावा यासाठी मी जिल्ह्याचे ठिकाणी जाऊन पोलिसांना फिट राहण्याचे धडे देणार असल्याचे सांगितले.

या निरोप समारंभावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सागर कवडे सर, पोलीस निरीक्षक अवचर सर, पोलीस उपनिरीक्षक खरात, पोलीस ठाणे कडील कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget