डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाचा दाखला देत ओबींसीची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे:- शिवबुध्दच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा अनुराधा देशमुख



पंढरपूर // प्रतिनिधी

ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे ही मागणी गेली कित्येक वर्षे होत आहे.अनेक खासदार तसंच विविध पक्षांच्या व सामाजिक संघटनांनी आणि लोकप्रतिनिधी तशी मागणी केली आहे.त्याच धर्तीवर केंद्राकडे शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य महिला आघाडी यांच्या वतीने करण्यात येत आहे.यावेळी २०२१मध्ये जी जनगणना होणार आहे.त्यामध्ये जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे आणि त्यामध्ये देखील ओबीसींची काॅलम स्वतंत्ररित्या सामाविष्ट केला जावा.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या हु,वेअर द,शुद्राज,या ग्रंथाचा दाखला देत जोपर्यंत ओबीसींची स्वतंत्र जनगणना होणार नाही.तोपर्यंत ओबीसी समाज आणि शासनाला देखील त्यांचे खरे प्रश्न समजणार नाहीत.त्यासाठी दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पात मागासवर्गीय,अल्पसंख्याक समाजासाठी विविध योजना यशस्वी होतील जेव्हा शेवटच्या रांगेमधला शेवटाचा नागरीक लाभार्थी होईल  तेव्हा ओबीसींची स्वतंत्र काॅलम स्वतंत्ररित्या जनगणना झाली असे समजले जाईल.त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी असेही शिवबुध्दच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा अनुराधा बाळासाहेब देशमुख म्हणाल्या.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget