पंढरपूर // प्रतिनिधी
सध्या कोरोना रोगाच्या साथीमुळे सर्वत्र लाॅकडाऊन व संचारबंदी करण्यात आली आहे.त्यामुळे सर्वांचे कामधंदे ठप्प आहेत.पालकांचे स्वता:चे परीतार्थ चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे इंग्रजी शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थीना व पालकांना शालेय फिस भरणे शक्य नाही.या चालू २०१९ते
२०२०शैक्षणिक वर्षात आपण दिलेल्या सवलतीमुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.आपल्या या निर्णयाचे शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने जाहीर अभिनंदन करतो.या अनुषंगाने पुढील शैक्षणिक वर्ष२०२०ते२०२१या वर्षाची फिस माफ करावी.असे आदेश महाराष्ट्रातील सर्व इंग्रजी शाळा संस्थाचालकांना देण्यात यावेत.व सर्व पालकांना दिलासा दयावा.यासाठी शिक्षणमंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांनी जातीने लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा ही विनंती करण्यात येत आहे.अन्यथा पालकांच्या संतप्त भावाना लक्षात घेत शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर लाॅकडाऊन व संचारबंदीचे नियम पाळून तीव्र आंदोलन करण्यात येईल.असे पंढरपूर विभागीय जिल्हाध्यक्ष विकास ढेरे हे म्हणाले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.