सर्वस्पर्शी कर्तुत्व, बहुगुणी व्यक्तिमत्व कर्तव्यदक्ष नेतृत्व:मा यशवंतराव शंकरराव कुलकर्णी





सांगली जिल्ह्यातील वारणेच्या कुशीत व सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगेत बत्तीश शिराळा तालुक्यातील अजोड आशा निसर्गरम्य हिरवळीवर वसलेल्या नाटोली या लहानश्या गावात प्रगतशील बागायतदार श्री. शंकरराव कुलकर्णी व  स्व. पार्वतीताई शंकरराव कुलकर्णी यांच्या पोटी श्री. यशवंत कुलकर्णी यांचा जन्म झाला. 
लहानपणापासून मा. कुलकर्णी साहेबांना सहकार क्षेत्र खुणावत होते. त्याच्या विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षणापासून त्यांनी अतिशय बारकाईने शिक्षण घेत सहकार क्षेत्रामध्ये अतिशय उच्च कोटीची पदवी प्राप्त केली. 

ह्याच मातीत पुरोगामी महाराष्ट्राला घडविणारे स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मयोगी भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नागनाथअण्णा नायकवडी, साहित्यकार अण्णा(भाऊ) साठे तसेच शेजारील जिल्ह्यातील राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या सारख्या विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या व आधुनिक महाराष्ट्र शिक्षण, समाजकारण, सहकार, राजकारण व साहित्य या सर्वांचे जिल्ह्यामध्ये मा. यशवंतराव कुलकर्णी साहेबांचा जन्म झाला.
या भूमीमध्ये आद्यक्रांतीकारकांची, स्वातंत्र्य सेनेची सहकार धुरीनांची, साहित्यकारांची व पुरोगामी विचारांची भूमी असल्याचे मानले जाते.
मा. यशवंतराव कुलकर्णी साहेबांना समाजकारण व सहकार क्षेत्राचे बाळकडू त्यांच्या घरातूनच मिळाले. वडील शंकरराव कुलकर्णी यांच्या 1970 सालापासून नाटोली गावात सहकारी दूधसंस्था, सहकारी सोसायट्या, सहकारी पतपेढ्या व आणिक आर्थिक संस्था उभा करून गोरगरीब दीनदलित कुटुंबातील तरुणांच्या हाताला काम देण्याचे व समाजात उभे राहण्याचे फार मोठे सार्थिकी काम त्यांनी केले. व मा. यशवंतरावांच्या मनावर हेच खरे जीवनाचे सार्थक आहे हे त्यांच्या मनावर बिंबविले लहानपणापासूनच यशवंतरावांना मैदानी खेळ, व्यायाम, सामाजिक कार्य व घरातील शेतीची फार मोठी आवड त्यांना निर्माण झाली त्यांनी त्यामध्ये तत्परता दाखवत अतिशय हुशारीने व बुद्धी कौशल्याने काम करण्यास सुरुवात करून  थोड्याच कालावधीमध्ये आपल्या नावाला साजेल असे काम करण्यास सुरुवात केली. मा. यशवंतराव कुलकर्णी साहेब यांनी अतिशय चिकाटीने काम करून बत्तीश शिराळा तालुक्यामध्ये आपले काम जोमाने करून 

 ज्या संस्था वडिलोपार्जित होत्या ते पुढे नेण्याचे  फार मोठे काम ते आजही करीत आहेत.
2014 साली मा. कुलकर्णी साहेबांनी जेव्हा श्री पांडुरंग सह. साखर कारखान्यावर सहाय्यक कार्यकारी संचालक पदाचा पदभार घेतल्यावर अतिशय कसोशीने काम करून थोड्याच दिवसांमध्ये श्री पांडुरंग सह. साखर कारखान्याचा कायापालट करून जुन्या इमारतीमधील सर्व कार्यालयीन कामकाज ( अकाउंट विभाग, शेती विभाग, जनरल विभाग, परचेस विभाग व चेअरमन व्हा चेअरमन केबीन) या सर्व विभागाचे हस्तांतरण करून कारखान्यात समोरील जागेमध्ये हे सर्व विभाग नवीन इमारती मध्ये आणुन आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली.  त्यांनी आपल्या कामाद्वारे सर्वांना शिस्त लावण्याची   किमया केली आहे.

मा. यशवंतराव कुलकर्णी साहेबांनी पांडुरंग परिवार चे सर्वे सर्वा मा. सुधाकरपंत परिचारक मालक यांच्या विचारांशी प्रेरित होऊन अतिशय योग्य रीतीने कारभार करून इतर सर्व कारखान्यांपुढे पांडुरंग कारखान्याचा आदर्श घालून दिला आहे. 
त्यांनी मोठ्यामालकांच्या नेतृत्वाखाली आपण कारखाना पंचक्रोशीतील सर्व सामान्य ऊस उत्पादक शेतकरी, कष्टकरी शेतमजूर कामगार हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडचणीसाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व कारखान्याच्या सर्वांगिण विकासासाठी अतिशय हिररीने काम करून आपल्या कार्याचा ठसा उमटविला. मा. कुलकर्णी साहेबांनी श्री पांडुरंग सह. साखर कारखान्याला अल्पावधीतच उंच शिखरावर नेऊन विक्रमाचे व किर्तीचे मानदंड उभा करून "पांडुरंगचे" नाव  सहकार क्षेत्रावर उमटविले आहे.


 आज दिनांक एक जुलै देवशयनी आषाढी एकादशी दिवशी ज्या भूवैकुंठ पंढरी नगरीमध्ये समस्त वैष्णवांचा मेळा भरतो त्याठिकाणी आदरणीय मोठ्या मालकांच्या व आमदार प्रशांत मालक यांच्या नेतृत्वाखाली माननीय यशवंतराव कुलकर्णी साहेबांनी जी गरुड झेप घेतली आहे त्याला सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तोड नाही!*

महाराष्ट्र राज्य एमडी असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय यशवंतराव शंकरराव कुलकर्णी यांचा जन्म दिनांक एक जुलै 1975 रोजी झाला आहे त्यांचे मूळ गाव आहे सांगली जिल्ह्यातील कांदे गाव असून तेथील वतनदार म्हणून सर्वांना परिचित आहेत त्यानंतर काही कारणास्तव त्यांच्या वडिलांनी बत्तीस शिराळा तालुक्यातील नाटोली या गावांमध्ये स्थायिक झाले होते. माननीय साहेबांच्या वडिलांनी 1970 साली निसटली या  छोट्या गावांमध्ये काही सहकारी संस्था स्थापन करून गावाच्या विकासाला उभारी देण्याचे फार मोठे काम केले होते.
माननीय कुलकर्णी साहेबांना लहानपणापासूनच पुस्तके वाटण्याचा फार मोठा छंद आहे युगंधर राजा, शिवछत्रपती राजा, छत्रपती शाहू महाराज व यताति  ही व अशी अनेक मोठी पुस्तके वाचून त्यांनी त्याच्यावर अभ्यास सुद्धा केला आहे. त्यांचा आवडता खेळ क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो आधी खेळ असून आवडते गायक म्हणून त्यांनी किशोर व लता मंगेशकर यांना पसंती दिली आहे. तर फिल्मस्टार म्हणून त्यांना अभिताभ बच्चन व रेखा यांचे चित्रपट पाहण्याचा त्यांना आवड आहे. त्यांचे सर्वात जास्त आवडते पुस्तक मृत्युंजय हे आहे. तुम्ही करण्याचे कार्य. संचालक (एम.डी.) झाला नसता तर कोण झाला असता? तर त्यांनी उत्तर दिले जिल्हाधिकारी किंवा मुख्य पोलीस अधिकारी. मा. कुलकर्णी साहेबांचे जीवनाचे अनेक पैलू असून कारखान्याचा कार्य. संचालक पदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी प्रथमतः कारखान्याला आय.एस.ओ. 9001: 2008 हे मानांकन मिळवून दिले. तसेच महाराष्ट्र शासनाचा सहकार खात्याचा सहकार भूषण हा अतिउच्च असा पुरस्कार मिळवून देऊन आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली.

 मा यशवंतराव कुलकर्णी साहेबांनी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या नियोजनामध्ये केलेले महत्त्वपूर्ण काम व आजपर्यंत कारखान्याच्या इतिहासात साहेबांच्या कार्य काळामध्ये कारखान्याला मिळालेले सर्वोत्कृष्ट पुरस्कार हेच साहेबांच्या यशाचे गमक आहे.
सद्यस्थितीला सर्व जगा बरोबरच भारत देशाला ज्या कोरोनाव्हायरस विळखा घातला आहे. अशामध्ये सुद्धा संपुर्ण साखर कारखानदारी पुढे अनेक यक्षप्रश्न निर्माण झालेले असताना त्यांनी सर्व आपल्या का कारखान्याच्या कामगारांना पंधरा दिवसाचा बोनस पगार बक्षीस स्वरूपात देऊन कामगारांच्या रोजीरोटीचा फार मोठा प्रश्न मार्गी लावला आहे. आपल्या श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना मध्ये प्रत्येक कामगाराला हाताला काम मिळावे या भावनेतून त्यांनी सॅनिटायझर निर्मितीची परवानगी माननीय मोठ्या मालकांच्या व प्रशांत मालकांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर करून घेऊन सँनिटायझर निर्मितीचे फार मोठे काम सुरू केले आहे व ते आजही चालूच आहे. त्यामध्ये पाच लिटर च्या पाँकिग पासून ते  100 MI च्या छोट्या बॉटल पर्यंत इफेक्टिव हँन्ड सनी टायझर सुपंत या नावाने मार्केटमध्ये विक्रीला आणले आहे. याची सर्वत्र मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा वाढली आहे. या "कोरोना" महामारी या संकटात सुद्धा अतिशय नेटकेपणाने नियोजन करून सँनिटायझर निर्मिती करून आर्थिक हातभार कारखान्यास लावला आहे. महाराष्ट्रातील नामांकित अश्या कारखान्यांमध्ये "पांडुरंगचे"नाव नेण्यांमध्ये माननीय यशवंतराव कुलकर्णी साहेबांचा फार मोठा हातभार आहे.
आज त्यांच्या जन्मदिवसाच्या म्हणजेच वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक त्यांचा संपादक पत्रकार मित्र म्हणून एक मनोभावे शुभेच्छा देतो की माननीय यशवंतरावजी कुलकर्णी साहेब "तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार" या पंक्ती प्रमाणे आपणास उदंड असे दीर्घायुष्य लाभो व आपले आरोग्य, ऐश्वर्य असेच अबाधित राहो अशी श्री समस्त वारकर्‍यांचे आराध्यदैवत युगे अठ्ठावीस विटेवर  हात  ठेवून उभ्या असलेल्या  अशा श्री पांडुरंग चरणी प्रार्थना करतो.


 लेख:-संपादक गुरुप्रसाद कुलकर्णी

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget