महाराष्ट्रातील ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा



वृत्तसंस्था // प्रतिनिधी

यंदा जूनच्या सुरूवातीलाच पावसाचं आगमन झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच जून महिन्यात महाराष्ट्रातल्या सर्वच भागांत पावसाने हजेरी लावली. 3 जुलै रोजी पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

येत्या 24 तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पवासाची शक्यता वर्तवली गेली आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली गेली आहे.

कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस सुरु आहे. पुढील दोन दिवसांनी कोकणात तसेच पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या 3 ते 4 दिवसानंतर राज्यातील पावसामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, असं पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितलं.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget