मोहोळ येथे पेट्रोल-डिझेल दरवाढीचा सायकल ढकलत विरोध करत केंद्रसरकारचा निषेध.



सोलापूर // प्रतिनिधी

मोहोळ विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध करत केंद सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत मोटारसायकल ढकलत मोहोळ तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला.

कोरोना सारख्या संसर्गजन्य आजार व त्यामुळे करण्यात आलेले लॉक डाऊन यामुळे जनता अद्याप सावरलेलीही नाही तोपर्यंत पेट्रोल व डीझेलमधील किमतीत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. ती दरवाढ मागे घेण्यात यावी या मागणीसाठी मोहोळ तालुका युवक काँग्रेसच्या वतीने मोहोळ येथील  शिवाजी चौकापासून तहसिल कार्यालयापर्यंत मोटारसायकली ढकलत मोर्चा काढण्यात आला, यावेळी या मोर्चात या भाजप सरकारच करायच काय  खाली मुंढी वर पाय, पेट्रोल डिझेल दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटनिस विनोद भोसले, सोलापूर जिल्हा काग्रेस सेवादल अध्यक्ष राजेश पवार, सोलापूर जिल्हा काॅग्रेस अनुजाती विभाग अध्यक्ष गौरव खरात, जिल्हा महिला अध्यक्षा शाहीन शेख, मोहोळ तालुका अध्यक्ष अशोक देशमुख, मोहोळ तालुका विधानसभा युवक अध्यक्ष आरीफ पठाण, मोहोळ शहर अध्यक्ष सागर देशमुख, सुरेश शिवपुजे, सिद्राम पवार, निलेश जरग, महादेव सुरवसे, राहुल कुर्डे, शाहु सलगर, बालाजी कांबळे आदी सहकार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget