गावोगावी भजन कीर्तनाला किमान ५० भाविकांना परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार


सोलापूर // प्रतिनिधी
 
वारकरी संप्रदायचा एक पाईक म्हणून आपणास एक विनंती करण्यात् येत आहे कि, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन चालू झालेले आहे आणि तेव्हापासून वारकरी संप्रदायचे भजन कीर्तन सर्व बंद झालेले आहे. सरकारला या भयानक परिस्थितीला सहकार्य करण्याकरिता सरकारने जि बंदी घातली आम्ही त्यालासुद्धा सहकार्य केले आणि पायदळ वारीची वर्षानुवर्षेची जि परंपरा होती ती कितीतरी पालख्यांची परंपरा खंडित झालेली आहे आमच्या मनात त्याचेही दुख आहे पण आता आपण लग्नाला किमान ५० लोकांना परवानगी दिलेली आहे, देशी दारूचे दुकाने उघडलेले आहेत तिथेही भरपूर गर्दी आहे, आणि मॉलमध्ये भरपूर गर्दी दिसत आहे पण अजूनही वारकरी संप्रदायचे भजन कीर्त न करण्याकरिता आपण परवानगी न दिल्यामुळे भाविकांना भजन कीर्तन करता येत नाहीत तरी आमची सरकारला नम्र विनंती आहे कि  अपन भजन कीर्तन करण्याकरिता किमान ५० भाविकांना परवानगी देण्यात यावी हि  आणि जो जिल्हा रेड झोन मध्ये आहे त्या जिल्ह्यामध्ये आपण परवानगी द्यावी असा आमचा आग्रह नाही पण रेड झोनमधील ग्रामीण भागात कोरोनाचा  प्रादुर्भाव नसेल तर त्या गावामध्ये आपण परवानगी देण्यात हरकत नाही म्हणून आमच्या या पत्राचा सरकारने गांभीर्याने विचार करून आणि वारकरी संप्रदायच्या भाविकांच्या भावनेचा आदर करून सरकारने लवकरात लवकर आम्हाला संपर्क साधून भजन कीर्तनाला अटी व नियम लागू करून परवानगी द्वावी आणि आपण जर आमच्या भावनांचा विचार न केल्यास  आम्ही दि ५/०७/२०२० ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि तहसील कार्यालयासमोर सोशियाल डीस्टन्सीग ठेवून किमान पाच पाच भाविक टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये नाराजी व्यक्त करणार आहोत तरी कृपया सरकारने आमच्या भावनेची विचार करून मागणीची पूर्तता करावी.
हभप:- तुकाराम महाराज भोसले युवा विश्व वारकरी सेना राष्ट्रीय संपर्कप्रमुख व व राष्ट्रीय प्रवक्ते जिल्हा सोलापूर विश्व वारकरी सेनेचे पदाधिकारी:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget