सोलापूर जिल्हा ब्युरो चीफ
येथील श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने कोरोना संकट काळात पंढरपूर शहर व तालुक्यात सर्वोत्कृष्ट काम करून समाजातील सर्वच घटकांना मदत केल्याबद्दल श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने मनसेचे सहकार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दिलीपबापू धोत्रे यांचा सत्कार करण्यात आला.
येथील पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमा प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कवडे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. एकनाथ बोधले, नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे हे होते.
दिलीप धोत्रे यांनी कोरोना या संकट काळात गोरगरीब व गरजु नागरीकांनासाठी जीवनावश्यक वस्तुंचे किट वाटून नागरीकांची सोय केली याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.