आषाढी एकादशी महापूजा फडणवीस यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर प्रतिकात्मक महापूजा करावी- दत्तात्रय बडवे-शिंदे


मठपती यांना आषाढी एकादशीस पंढरपुरात प्रवेश द्यावा

पंढरपूर // प्रतिनिधी

कोरोना विषाणू संसर्गाचे कारण दाखवून आषाढी एकादशीस व चातुमासास मठपती यांना अद्याप परवानगी देण्यात आली नाही.नुकतेच स्थानिक जागा मालकांचे नातेवाईक हे सुमारे 7 हजार पेक्षा जास्त पंढरपुरात आलेले आहेत. त्याच्या नंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची मिटींग पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे घेतली. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात जमा झाले होते यामुळे सोशल डिस्टेटींगचा फज्जा उडाला यानंतर पोलीसांना विश्रामगृहाचे दार बंद करावे लागले. यात्रा भरू नये म्हणून  10 % पोलीस अधिकारी व कर्मचारी येणार असून मानाच्या पालखीबरोबर सुरक्षेसाठी तैनात केलेले कर्मचारी व मानकरी असे सुमारे 100 व्यक्ती येणार आहेत असे ठरलेले आहे. इतके लोक पंढरपुरात आलेले चालतात परंतू आषाढी एकादशी व चातुर्मासासाठी 70 मठपतींना परवानगी का नाकारतात ? त्यातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे पंढरपुरात महापूजेसाठी येणार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागेल. यामुळे प्रशासनावरील ताण वाढणार आहे. आधीच कोरोनामुळे प्रशासन गंभीर अवस्थेत असताना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे आणखीनच  त्यात वाढ होणार आहेत. कारण मुख्यमंत्र्यांसमवेत मुंबई अथवा पुणे या कोरोनाग्रस्त असलेल्या भागातील लोकप्रतिनिधी असल्यास त्यांच्यामुळे येथे कोरोनाचा फैलाव वाढू शकतो त्यामुळे याची जबाबदार कोण घेणार ? तसेच कोरोनाच्या काळात मा.मुख्यमंत्री यांनी मंदिरात देव नाही तर माणसात देव आहे असे वक्तव्य  केले होते. तरी माणूसरूपी देवाचा जीव वाचविण्यासाठी मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर प्रतिकात्मक पूजा केली होती त्याच प्रमाणे श्री विठ्ठल रूक्मिणीची प्रतिकात्मक पूजा करावी अशी मागणी अखिल भारतीय शु.य.कण्व (प्रथम शाखा) परिषद नाशिक प्रणित पंढरपूर शहर कण्व परिषदचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बडवे (शिंदे) यांनी ईमेलद्वारे पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच शासनाने 7 मानाच्या पालख्यास परवानगी दिली आहे. परंतू 7 मानाच्या पालख्या व इतर संतांना मान का देण्यात येत नाही ? सर्व संतांना समान वागणूक मिळावी. सदरच्या पालख्या पुर्वपरंपरेप्रमाणे  संत नामदेव पायरीपासूनच जात असत. परंतू सन 1998 पासून ह.भ.प.विवेकानंद वासकर महाराज अध्यक्ष असताना त्यांना मंदिरात प्रवेश मिळाला. व इतर पालख्यांना प्रवेश देण्याचे त्यावेळी ठरले होते. परंतू त्याचा विचार झाला नाही. तसेच वरील लोकांना पंढरपूरात आषाढी एकादशीदिवशी प्रवेश दिल्यास मानाच्या पालख्याप्रमाणे संत रोहिदास, संत चांगदेव (चांगावटेश्वर), संत समर्थ रामदास, संत भगवानबाबा, श्रीसंत कैकाडी महाराज (जन्मगाव मनमाड येथून पालखी येते) त्याचप्रमाणे अंमळनेरहून श्री विठ्ठल पादुका प्रसाद महाराज अंमळनेरकर, चैतन्य महाराज देगलूरकर आदि पंढरपूरात जागा मालकीच्या असणाऱ्या मठपती यांना एकादशीस त्यांच्याबरोबर 4 व्यक्तींसाठी परवानगी देण्यात यावी. अशी विनंती ही केलेली आहे. सदरच्या निवेदनाच्या प्रति ईमेलद्वारे मा.शरदचंद्रजी पवार सोा, मा.सुशिलकुमार शिंदेसोा, मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सोा, मा.देवेंद्र फडणवीस सोा, पालकमंत्री सोा, जिल्हाधिकारी सोा, मा.जिल्हा पोलीस प्रमुख सोा, मा.अध्यक्ष व कार्यकारी अधिकारी सोा, मंदिर समिती व सर्व ह.भ.प.महाराज मंडळी यांना पाठविलेल्या आहेत

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget