वृत्तसंस्था // प्रतिनिधी
कोरोनामुळे आषाढी वारीतील पायी वारीचे स्वरूप बदलून राज्य सरकारने हेलिकॉप्टर किंवा बसद्वारे संत ज्ञानेश्वर माउलींच्या पादुका पंढरीत नेण्याचा निर्णय जाहिर केला. त्यासाठी राज्य सरकार देत असलेल्या हेलिकॉप्टर किंवा बसच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी आपल्याला द्यावी, यासाठी दिघीतील शिवसेनेचे विभागप्रमुख संतोष वाळके यांनी तयारी दर्शविली आहे.
याबाबत वाळके यांनी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे यांना वाळके यांनी निवेदन दिले. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आमच्या घरात पंढरीच्या वारीची आणि अन्नदान करण्याची परंपरा आहे. पालखी मार्गावर दिघी येथे माउलींचा सोहळा आल्यानंतर स्वागत जोरदार केले जाते. संपूर्ण कुटुंबच वारकरी असून, माउलींवर अढळ श्रद्धा आहे.
यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणे वारी भव्य नसणार आहे. परिणामी यंदाच्या वर्षी कोणत्याच प्रकारची सेवा आमच्या कुटुंबाकडून होणार नाही. ही खंत राहू नये, यासाठी माउलींच्या पादुका मोजक्याच व्यक्तींना सोबत घेत हेलिकॉप्टर अथवा बसद्वारे राज्य सरकारकडून पंढरपुरात नेल्या जाणार आहे. माउलींचा सेवक म्हणून या खर्चाची जबाबदारी आपल्याला मिळावी. या वेळी माजी नगरसेवक रमेश गोगावले, विलास कु-हाडे, ज्ञानेश्वर घुंडरे आदी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.