सोलापूर // प्रतिनिधी
पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना हे सोलापूर दौऱ्यावर आले असून त्यांचा फेटा बांधून व पुष्पहार घालून जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पवार यांनी सत्कार केला
यावेळी
पत्रकार संरक्षण कायदा
राज्यातील पत्रकारांची नोंदणी
सर्वच जेष्ठ पत्रकारांना समान पेन्शन
पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी
पत्रकारांसाठी घरकुल योजना
या सह पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली
पत्रकारांच्या प्रश्नावर कोणतेही तडजोड केली जाणार नाही राज्य सरकार ने पत्रकारांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवले पाहिजेत अन्यथा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ आशिषकुमार सुना दिला आहे
याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार बाबा काशीद संतोष भोसले उपस्थित होते

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.