सोलापूर // प्रतिनिधी
जिल्ह्यात आतापर्यंत 1093 लोक कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत तर 805 जणांवर सध्या जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.
सोलापूर ग्रामीण मध्ये आज एकूण 179 पॉझिटिव्ह आहेत तर 11 मृत आहेत. 99 जाणावर उपचार सुरू आहेत. 69 जण बरे झाले आहेत. ग्रामीण भागात आज 18 पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले.मृत कोणीही नाही.
सोलापूर शहरात आज 114 अहवाल प्राप्त झाले. यात 67 निगेटिव्ह 47 पॉझिटिव्ह अहवाल मिळून आले. यामध्ये 30 पुरुष आणि 17 महिलांचा समावेश आहे.
आज मृत्यू पावलेल्यांची सोलापूर शहरातील संख्या 7 आहे .यात 6 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश आहे.
सोलापूर शहरात आतापर्यंत 891 पॉझिटिव्ह रुग्ण मिळालेत तर 161 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या 706 जणांवर उपचार सुरू आहेत तर 1024 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.