पंढरपूर // प्रतिनिधी
युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष व विश्वक्रांती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तहसीलदार वैशालीताई वाघमारे , मा. नगरसेवक महेश साठे, दीपक येळे , धर्मराज बोडके, भादुले, सोमनाथ आरे, समाधान पोळ, दिलीप मलपे, भाऊराव जाधव , कृष्णा कवडे, सतीश शिंदे, अशोक जाधव, नितीन वाघमोडे आदि उपस्थित होते.
यावेळी 71 रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यांस किराणा मालाचे किट, हेल्मेट व कुकर भेटवस्तू देण्यात आला.
संदिप शिंदे यांनी राबविलेल्या उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक केले जात आहे.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.