उजनीवर अवलंबून असलेल्या शेतकर्यांउसाठी आनंदाची बातमी; दौंडमधून उजनीत विसर्ग सुरू


वृत्तसंस्था // प्रतिनिधी

उजनीवर अवलंबून असलेल्या शेतकर्यांउसाठी आनंदाची बातमी असून, चालू  हंगामात  उजनीत दौंडमधून 2 हजार 717 क्युसेकचा विसर्ग सुरू झाला आहे. विसर्गात  आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात संततधार चालू असल्याने भीमा पात्रावरील धरणांतील पाणीसाठ्यात वाढ दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत धरणातील पाणीसाठा एक टक्क्यानी वाढला आहे.

संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत उजनी धरणात 1 टक्का पाणीसाठा वाढला आहे. आतापर्यंत 54 मि.मी. पाऊस पडला असून त्याचाही परिणाम उजनी पाणीपातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे उजनी पाणीसाठ्याचा प्रवास वजामधून अधिककडे होण्यास आशा निर्माण झाल्या आहेत.

भीमा नदीच्या खोर्याात असलेल्या सर्व धरणांमध्ये 16 जून रोजी एकूण 19 धरणांपैकी 17 धरणांचा उपयुक्त पाणीसाठा आहे. खोर्यालतील सर्वात मोठ्या असलेल्या उजनी धरणात मात्र नेहमीप्रमाणेच उणे 23 टक्के इतका पाणीसाठा आहे. उर्वरित 19 धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत  समाधानकारक पाणीसाठा आहे.

गेल्या 3 वर्षांत पाऊस लांबत गेल्याने भीमा नदीच्या खोर्या त पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होत होती. मात्र गेल्यावर्षी परतीच्या पावसाचा मुक्काम लांबला आणि त्यामुळे पाणी वापरही नियंत्रित झाले. यंदाच्या वर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतीच्या पाण्याची मागणी कमी झाली आहे.

यंदा पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्याी टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये मिळून 15 जून रोजी तब्बल सहा दल.घ.मी. पाणीसाठा आहे. उजनी वगळता वरील 19 धरणांमध्ये सरासरी 20 टक्के इतका पाणीसाठा आहे. साधारणपणे मोसमी पाऊस सक्रिय होताना धरणांमध्ये एवढा पाणीसाठा नसतो, असे निरीक्षण जलसंपदा विभागाने नोंदवले आहे.

उजनीत दौंड येथून येणार्यास विसर्गाला सुरुवात झाल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या उजनीच्या पाणीसाठ्यात येत्या दोन दिवसांपासून हळूहळू वाढ होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकर्यांरचे लक्ष उजनी धरण 100 टक्क्याकडे लागले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget