वाद कोरोना हॉस्पीटल चा कोरोना हॉस्पीटल ऐवजी मेडिकल कॉलेजची मागणी करावी हीच वेळ आहे. हा तर अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न




पंढरपूर // प्रतिनिधी

सध्या देशात व राज्यात कोरोना विषाणु धुडगुस घालत आहे.तोच विषाणु सोलापूर  जिल्हात वेगाने फैलावु लागला आहे. त्यामुळेच पंढरपूरात कोरोना हॉस्पिटल ची गरज निर्माण  झाली होती. त्यामुळे पंढरपूरात स्थानिक नेत्यामध्ये बरेच वाद उठले त्यावेळी प्रशासनाने वाखरी येथील एम.आय.टी इमारत ताब्यात घेऊन मुंबई खालोखाल भव्य अशी सोय पंढरपूरात निर्माण केली  तरी सुद्धा हा वाद काही मिटेना. प्रत्येक लोकप्रतिनिधी श्रेय घेण्यासाठी धडपडू लागले आहेत, त्यातच काल नगरपालिकेने कोविड हॉस्पिटल निर्माण करण्याचा केविलवाणा ठराव पास केला. वास्तविक पाहता नगरपालिकेच्या सरकारी दवाखान्याच्या दोन इमारती असून कर्मचार्‍याच्या पगारावर 100 टक्के ग्रॅट असताना तो पांढरा हत्ती संभाळण्यास असमर्थ आहेत असे समजुन लोकप्रतिनिधीनी तो जाणून बुजून  बंद पाडण्याचा प्रयत्न केला. दर वर्षी दवाखाना इमारतीवर किमान 10 लाख रू खर्च केला असता तर आज नविन हॉस्पिटल काढण्याची गरज नव्हती. सध्या देशाच्या वातावरणात केंद्र सरकार व राज्य सरकार हॉस्पिटलवर जे मागतील ते देण्यास तयार असताना पंढरपूरात भव्य असे मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी दोन्ही लोकप्रतिनिधीनी प्रयत्न करावयास हवा होता. केद्रातुन भाजपा सरकारच्या लोकप्रतिनिधी नी परवानगी आणली असती व राज्यसरकारची परवानगी विधानसभा सदस्या कडून आणली असती तर मेडीकल कॉलेज ची परवानगी मिळाली असती. परंतु हे दोन्ही नेते सत्तेसाठी नगरपालिकेत एक होतात.मागील इतिहासामध्ये हे दोन्ही गट सत्ते साठी नगरपालिकेत एक झाले होते. याना सत्ता हवी आहे विकास नको आहे. त्यातच जामखेड येथील राष्ट्रवादीचे तरूण तडपतार आमदार मा.श्री.रोहित दादा पवार यांनी ज्या सहकारी किंवा खाजगी संस्था नफ्यात चालतात अशा संस्थेस राज्यातील हॉस्पिटल देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. सदर प्रस्तावाचा येथील स्थानिक नेत्यानी आवर्जुन विचार करावयास हवा होता. पुर्वी कराड येथील एक व्यक्ती मंदिर समिती तर्फे  कॉटेज हॉस्पिटल चालवण्यास तयार होते.परंतु त्याला विरोध झाला. त्यातच पंढरपूरात अनेक अदयावत हॉस्पिटल आहेत. तसेच 100 नामवंत डॉक्टरर्स पंढरपूरात आहेत. अशा चोहु बाजुन कडून सकारत्मक वातावरण असताना मेडिकल कॉलेजची मागणी करावयास हवी होती.तसेच याचा फायदा चारी वार्‍याना येणार्‍या यात्रे करूना पण होईल. परंतु तसे न झाल्यामुळे पंढरपूर विकासा पासुन वंचित राहिलेले आहे.तरी सदरच्या मागणी ऐवजी मेडिकल कॉलेजची मागणी मुख्यमंत्री,व लोकप्रतिनिधीकडे दत्तात्रय बाळासाहेब बडवे जिल्हाध्यक्ष ब्राम्हण सेल यांनी  केली आहे. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget