श्री.विठ्ठल रुक्मिणी समितीने बंद केले अन्नछत्र पुन्हा सुरु करावे शिवबुध्द संघटना व आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशन वतीने मागणी



पंढरपूर // प्रतिनिधी

गेली तिन महिने झाली कोविड १९ या रोगामुळे महाराष्ट्रातील दक्षिण काशी समजले जाणारे श्री क्षेत्र पंढरपूर हे बंद आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून बेघर गरीब,अडकलेले वारकरी यांच्या साठी टाळेबंदी झाल्यापासून ते ३१ मे रोजी पर्यंत जेवणाची पाकिटे तयार करून दिल्याबद्दल प्रथमता पंढरपूरचा नागरिक म्हणून आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत. परंतु सध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्र शासनाने टाळेबंदिवरील काही निबंध शिथिल केलेले असले तरी पंढरपुरातील काही हातावरील पोट असणारे कुटुंबाना दोन वेळेचे पुरेसे अन्नही मिळत नाही गेली चैत्री वारी जशी रद्द झाली तशी
आषाढी यात्रा हि रद्द झाली आहे त्यामुळे अनेकांचे उद्योग व्यवसाय बंद पडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.या उपासमारीमुळे अनेक कुटुंब हतबल झालेले आहेत.
आजपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांनी बेघर, बाहेरील वारकरी, गरीब, भिकारी, अपंग यांना अन्न पुरवठा केल्या प्रमाणेच पंढरपुरातील नागरीकासाठीही अन्नाचे पाकिटे तयार करून श्री जगतगुरु संत तुकाराम महाराज भवन मध्ये असलेले
अन्नछत्रामधून ती पाकिटे पंढरपुरातील गरजूंना येऊन घेऊन जाण्याची व्यवस्था करावी हि विनंती याचा गांभीर्याने विचार करून बंद केले अन्नछत्र पुन्हा सुरू करावे.अशी मागणी शिवबुध्द संघटना व आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशन वतीने करण्यात आली आहे.विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापन बालाजी पुलडवाड साहेब यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे. यावेळी निवेदन देताना शिवबुध्दचे संदिपराजे मुटकुळे,आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर कदम,औंकार चव्हाण, गणेश निंबाळकर, सतिश माने,शेखर भोसले, गणेश थिटे, इत्यादी उपस्थिती होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget