सोलापूरच्या लाँकडाउनबद्दल उद्या सविस्तर चर्चा करुन निर्णय घेणार:- पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे




सोलापूर // प्रतिनिधी

ग्रीन झोन असणारे सोलापूर बाधित रुग्णांच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या आकडेवारीमुळे वेगाने रेडझोन झाले. राज्य शासनाने पर्यायाने जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन फेकून अनलॉक केलं, असं असतानाही सोलापूर शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या , मृत्यूचा दर दिवसेंदिवस वाढतच आहे. शहर हद्दीत असणारा संसर्ग ग्रामीण भागात पसरत चाललाय. तालुक्यांमध्ये हळूहळू याचा प्रसार वाढत आहे. दोन एक तालुके सोडले तर ग्रामीण भागात याचा शिरकाव झाला आहे .येथेही मृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यातील इतर जिल्हा प्रशासनाने काही काळापुरती संचारबंदी लागू केली.

दरम्यान, कोरोनाचा कहर आटोक्‍यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन ,पोलीस ,वैद्यकीय विभाग झटत आहे परंतु हे आधीपासूनच केले असते तर आजचे चित्र वेगळे असले असते असे उघडपणे सर्वसामान्य नागरिक बोलत आहेत.सोशल मीडियावर एक होते सोलापूर .! असे म्हणावे लागेल, इथपर्यंत नेटिझन्स ट्रोल करत आहेत.

कोरोना ‘कंट्रोल’मध्ये आणण्यासाठी जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करत आहेत. शहर व ग्रामीण भागातील अनेक उद्योग व्यवसाय काही अटींवर सुरू झाले आहेत, परंतु सोशल डिस्टन्स न पाळणे, मास्कचा वापर न करणे, दुचाकीवर डबलसीट, प्रवासी वाहतुकीबाबत नियम धाब्यावर बसवले जात आहेत. कित्येक दुकानदार महापालिका आयुक्तांनी दिलेली नियमावली पाळत नसल्याचे आढळून आले आहे.

या पार्श्वभूमीवर 15 दिवसांसाठी सोलापूर शहर व परिसरात कडक संचारबंदी करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी तयार केलाय.

सोलापूरचे लॉकडाऊन या प्रस्तावाबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संवाद साधला असता उद्या गुरुवारी मी सोलापुरात आल्यानंतर प्रमुख अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करणार आहे. शहर व ग्रामीण भागातील परिस्थिती यासंदर्भात मी आढावा घेतला आहे. अधिकाऱ्यांची मते जाणून या प्रस्तावाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल .तयार केलेला प्रस्ताव मी पालकमंत्री या नात्याने राज्य शासनाकडे पाठवून देणार आहे. असं त्यांनी सांगितले. दौऱ्यावर असताना अनेकांची मते जाणून घेतलेली आहेत उद्या गुरुवारी अधिकाऱ्यांशी बोलून प्रस्तावाबाबत निर्णय घेतला जाईल.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget