सोलापूर // प्रतिनिधी
महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या मार्फत जाहीर केलेल्या उन्हाळी परीक्षेच्या निकालात फॅबटेक औषधनिर्माणशास्त्र पदविका वर्गातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सदरच्या वर्गाचा 100 टक्के निकाल लागला आहे. यामध्ये तब्बल 64 पैकी 63 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी दिली आहे.
प्रथम वर्षातील कु. निकीता रघुनाथ दुधाळ व सुवर्णा अंकुश पाटील या विद्यार्थिनीणी 96.18 टक्के गुण प्राप्त करून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. कु. आरती उत्तम धांडोरे 96.9. टक्के द्वितीय, तर सचिन गुरुप्पा हताली,प्रियांका आंण्णासाहेब कोळसे-पाटिल व प्रियांका व्यंकट चवरे 95 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तिर्ण झाले आहेत.
महाविद्यालयातील या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा.श्री. भाऊसाहेब रुपनर,कार्यकारी संचालक मा. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस, प्रा.काझी सर्व विभाग प्रमुख, व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.