वृत्तसंस्था // प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल यूनिवर्सिटी लोणेरे, जिल्हा रायगड यांच्या मार्फत बी. फार्मसी द्वितीय सत्राचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या निकालात फॅबटेक औषधनिर्माणशास्त्र डीग्रीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे. सदरच्या वर्गाचा 100 टक्के निकाल लागला आहे. यामध्ये तब्बल 97 पैकी 57 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्याची माहिती
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी दिली आहे .
बी फार्मसी प्रथम वर्षातील द्वितीय सत्रात कु. आश्लेशा शिवाजी लेंडवे या विद्यार्थिनीणी 9.9 एसजीपीए गुण प्राप्त करून प्रथम येण्याचा मान मिळविला. कु. स्नेहल पोपट बंडगर 9.72 एसजीपीए गुण मिळवून द्वितीय क्रमांकाणे उत्तिर्ण झाली. तर प्रियंका विलास घाटगे हि 9.62 एसजीपीए गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तिर्ण झाली आहे.
महाविद्यालयातील या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा.श्री. भाऊसाहेब रुपनर,कार्यकारी संचालक मा. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस, प्रा.एस.एम.काझी,प्रा.श्रीनिवास माने,प्रा. शिरीष नागणसूरकर, सर्व प्राध्यापकवर्ग यांनी अभिनंदन केले.



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.