यंदाचा गळीत हंगाम 2020- 21 जोमाने पार पडणार:चेअरमन सरोज काझी



फॅबटेक शुगर कारखान्याचे मिल रोलर पुजन संपन्न.


वृत्तसंस्था प्रतिनिधी:- गळीत हंगाम 2020-21 साठी फॅबटेक शुगर शुगरचे मिल रोलर पूजन मंगळवेढा मार्केट कमिटीचे सभापती सोमनाथ आवताडे व फॅबटेक प्रोजेक्ट ऑण्ड इंजिनिअर्स प्रा.लि.चे  संचालक दिपक रुपनर यांचे शुभहस्ते धार्मिक विधी करून पूजन करण्यात आले. तसेच चेअरमन सरोज काझी यांचे हस्ते पहिला वाहन करार करून तोडणी वाहतुकीचा कराराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय माने व बापू काकेकर मंगळवेढा मार्केट कमिटीचे तज्ञ संचालक सत्यजित सुरवशे यांची प्रमुख उपस्थिती होती.

संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा आमचे मार्गदर्शक समाधान (दादा) आवताडे व सांगोला तालुक्याचे शिवसेना नेते व मार्गदर्शक भाऊसाहेब रुपनर यांचे मार्गदर्शनानुसार कारखान्याची ओव्हर ऑईलिंगची कामे गतीने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज मिल रोलरचे पूजन करून सुरुवात केली आहे गेल्या गळीत हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे उसाची कमतरता असूनही कारखान्यांने शेतकऱ्यांचे विश्वासावर चांगले गाळप केले गळीत हंगाम 2020- 21 हा लवकर चालू करण्याच्या दृष्टीने कारखान्याची पूर्वतयारी चालू असल्याबाबतची माहिती सरोज काझी यांनी दिली.

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक मोहन पिसे, कात्राळ व कर्जाळचे उपसरपंच जकराया नरुटे, चीफ इंजिनियर किशोर फरांदे, चिफ केमिस्ट मोहन पवार व चंद्रकांत विभुते, डिस्टिलरी मॅनेजर चेतन काळे, वित्त अधिकारी रघुनाथ उन्हाळे, ऊस विकास अधिकारी रामदास शिंदे, ऊस पुरवठा अधिकारी उत्तम ढेरे व दशरथ रोकडे, वाहन मालक शाहीर ताड, माणिक डोळस, धनाजी ताड, संजय माने, डम्पिंग व बैलगाडी मुकादम रामदास सानप, किसन सांगळे, मच्छिंद्र गोल्हार, तात्यासाहेब कंठाळे, गिज्ञानदेव नागरगोजे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget