सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज मंगळवारी एकूण 40 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 32 अहवाल निगेटिव्ह आले असून 8अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 4 पुरुष तर 4महिलांचा समावेश होतो .आज 248 प्रलंबित तपासणी अहवाल असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज 68 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.
आज 3 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये यांचा मृत्यू झाल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
दमानी नगर ,लक्ष्मी पेठ परिसरातील एक महिला, जुळे सोलापूर जानकीनगर येथील एक पुरुष, रेल्वे कॉटर्स मोदी येथील एक महिला, डीआरएम ऑफिस जवळ रेल्वे लाईन्स जवळ 1 पुरुष, मंत्री चंडक नगर, विजापूर रोड एक पुरुष ,बसवेश्वर नगर ,होटगी रोड एक पुरुष ,कर्णिक नगर एक महिला,तर हत्तुरे नगर होटगी रोड एक महिला बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे
आज मृत्यू नोंद झालेली व्यक्ती पाच्छा पेठ परिसरातील 80 वर्षांचे पुरुष दुसरी व्यक्ती पूना रोड परिसरातील मडकी वस्ती भागातील 65 वर्षाचे पुरुष तर तिसरी व्यक्ती कुमठा नाका परिसरातील आंबेडकर नगर परिसरातील 84 वर्षाची महिला आहे.
आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 3345 इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 309 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1195 इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1841 इतकी समाधानकारक आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.