रॅपीड अँटिंजन टेस्ट मुळे कोरोनाची साखळी शोधण्यासाठी होणार मदत: विवेक परदेशी



आज नवे ९ रुग्ण आढळून आले तर ६ नागरिक कोरोना मुक्त झाले. 

  पंढरपूर प्रतिनिधी :- पंढरपुर शहर व तालुकामध्ये ९ कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्या नंतर तातडीने ९० नागरिकांची रॅपीड अँटिंजन टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आले असून कोरोनाची नवीन साखळी तातडीने शोधण्यासाठी या प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग होणार असल्याचे सभापती विवेक परदेशी यांनी यावेळी सांगितले.



 यामुळे कोरोनासह इतर आजारांनी त्रस्त पेशंटचे जीव वाचवण्यासाठी मदत होइल. तसेच आज ६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. त्यांना पुढील १४ दिवस काटेकोरपणे होम कॉरंटाइन पाळायची सुचना देण्यात आले.

         
आज एकुण ९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे तसेच रॅपीड अँटिंजन टेस्ट मध्ये २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहे.आज मिळालेल्या माहितीनुसार पंढरपुर  शहर व तालुक्यात ३३ रुग्णांचे उपचार सुरु आहे. त्यापैकी २५ रुग्ण पंढरपूर शहरातील आहेत, ६ रुग्ण ग्रामिण भागातील असुन, २ रुग्ण इतर तालुक्यातील व जिल्हातील आहेत.

            
सद्याच्या परिस्थितीत सर्वांनी काळजी ध्यावी. घरा बाहेर वावरताना सुरक्षीत फिजीकल अंतर ठेवावे, मास्कचा वापर करावा व  साबणाने हात सतत धुवावे व पॉझिटिव्ह व्यक्तीचे संपर्कातील व्यक्तींचा शोध घेत असताना आवश्यक ती खरी माहीत देऊन प्रशासनास सहकार्य करावे असे अवाहन सभापती विवेक परदेशी यांनी केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget