बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं मुस्लीम बांधवांना महत्त्वाचं आवाहन


वृत्तसंस्था // प्रतिनिधी
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना यंदाचं bakra eid 2020 साजरा करण्याबाबत अतिशय महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढवण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करत आहोत, असं म्हणत मागील चार महिन्यांमध्ये साजरा करण्यात आलेल्या सणवारांचं उदाहरण मुख्यमंत्र्यांनी दिलं.

मागील ४ महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले, त्याचप्रमाणे येणारी बकरी ईददेखील साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचं पालन करून साजरी व्हावी अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

मंगळवारी बकरी ईदसंदर्भात आयोजित एका ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख तसंच इतर मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी यांनी देखील बकरी ईद साधेपणाने आणि कुठेही गर्दी न करता साजरी करावी असं आवाहन यावेळी केलं. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget