महिलांना बचतगटविषयी विविध मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन


पंढरपूर // प्रतिनिधी

सर्वत्र महिला बचत गटाची चळवळ चांगली चालु होती. परंतु या कोरोनाच्या महामारीत अनेक छोटे मोठे व्यवसाय कोलमडले आहेत. आपल्या व्यवसायवर संकट आल्यास त्याला पर्याय म्हणून प्रत्येक व्यवसाय करणारे आपल्या व्यवसायचा विमा उतरविला जातो. त्याच पद्धतीने महिलांना बॅंक अथवा मायक्रो फायनान्स कडुन कर्ज घेताना विमाच्या नावाखाली काही रक्कम घेण्यात येत असते.त्यामुळे या कोरोना संकटकाळात व्यवसाय बुडालेमुळे हे व्यवसाय पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी त्या महिलाच्या व्यवसायवरील कर्जाला विमा लागू करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी आदेश द्यावेत यासाठी मनसेचे राज्याचे नेते दिलीप धोत्रे यांनी ना. उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे.
   महिलांनी आपले पूर्वी नियमित हप्ते भरून व्यवसाय केला होता. परंतु या कोरोनाच्या महामारीत व्यवसाय बंद पडून तयार केलेला पदार्थ आणि खाद्य वस्तूची नासाडी होऊन व्यवसायमधील भांडवल संपले आहे. भांडवल संपल्यामुळे आता नव्याने हा व्यवसाय उभा करण्यासाठी नवीन भांडवल मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी या महिलांना कर्ज देणाऱ्या विविध संस्थांनी पूर्वी दिलेल्या कर्जाला विमा लागू करून भांडवल उपलब्ध करून द्यावे आणि ही महिला बचत गटाची चळवळ सुरु करावी अशी मागणी केली आहे.
   या महामारीमध्ये सुप्रीम कोर्ट आणि रिजर्व बॅंक यांनी जे कर्जासंदर्भात आदेश दिले आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी असे आदेश मुख्यमंत्री म्हणून आपण संबधित संस्थाना देण्यात यावे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरीब महिलांना न्याय मिळून. सक्तीने वसुली

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget