बॅंकेच्या त्रासाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या



वृत्तसंस्था // प्रतिनिधी

गिरझणी ता.माळसिरस येथील शेतकरी मोहन देवराव सुर्यवंशी या शेतकर्याने 8 जुन 2017 रोजी ICICI बैंक शाखा अकलूज यांच्याकडुन 700000 (सात लाख) कर्ज घेतले होते.2017 ते 2019 पर्यंत हप्ते सेटेलमेंट करुन कर्जाचे हप्ते भरायचे ठरलें होते.पिकाचे नुकसान झाले होते म्हणून ते कर्ज भरु शकले नव्हते.कोरोनच्या काळात RBI बँकेने कर्जाचे हफ्ते भरु नका असे आदेश पारीत केले असताना तरी सुद्धा ICICI बैंक शाखा अकलूज यांच्या अदित्य कुलकर्णी, आनंद शेळके अधिकार्यांकडुन वारंवार मोहन सुर्यवंशी यांना कर्जाच्या हप्त्यासाठी लाॅकडाॅनच्या काळात वारंवार फोन येत होते.हप्ते न भरल्यास शेतीचा लिलाव केला जाईल.व तुम्हाला जेलमध्ये बसावे लागेल.आशा धमक्या दिल्या जात होत्या.या भितीपोती व त्रासाला कंटाळून कर्जदार शेतकरी मोहन सुर्यवंशी यांनी आपल्या शेतीत दि.8/6/2020 रोजी आंब्याच्या झाडाला गळफास घेउन आत्महत्या केली आहे.सदर घटनेला 22 दिवस उलटून ही कसल्याही प्रकारची कार्यवाही झाली नसुन पिडीत कुटुंबास प्रकरण दाबण्यासाठी प्रेशर आणला जात आहे. तरी सदर घटनेची योग्य ती चौकशी करुन दोषी अधिकार्यांवर कार्यवाहीची मागणी युवासेना अकलूज शहराच्या वतीने शेखर भैय्या खिलारे यांनी निवेदनाद्वारे मा जिल्हा अधिकारी सोलापूर ,प्रांत अधिकारी अकलुज डी वाय एस पी,तहसिलदार माळशिरस, पोलीस निरीक्षक अकलुज यांच्या कडे.करण्यात आली आहे.सदरचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या कडे पाठवण्यात आले. आहे.शेतकर्याच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यासाठी युवासेना आक्रमक झाली आहे.वरिल अधिकार्यांची चौकशी करून तातडीने  ३०६ प्रमाणे गुन्हा नोंद करवा नाही तर प्रांत कार्यालय ५/६/२०२० रोजी प्रांत कार्यालय अकलुज येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget