अजित पवारांच्या वक्तव्याचा निलेश राणे यांच्याकडून निषेध



मराठा समाजाचे हक्काचे प्रश्न सोडवा अन्यथा वणवा पेटायला वेळ लागणार नाही.

वृत्तसंस्था // प्रतिनिधी

छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करतानाच वेळ पडली तर हक्कासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याचे प्रणेते, माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे. सरकारने वेळीच आरक्षण, सारथी व मराठा समाजाच्या प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अन्यथा वणवा पेटायला वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
          निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना पुढे म्हणाले की, जर मराठा समाजाच्या सगळ्या प्रतिनिधींचं ऐकायचं नव्हतं तर मीटिंग का बोलावली. उपमुख्यमंत्री अजित पवारांना जेव्हा प्रतिनिधींनी विचारलं संभाजीराजेंना मागे का बसवता तर ते म्हणाले राज्यसभेत पण राजे मागेच बसतात. अपमान करण्यासाठी सारथीची बैठक लावली होती का? असा सवाल करतानाच गरम माथ्याचा मराठा हक्कसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करायला मागे पुढे पाहणार नाही. ते पुढे म्हणाले की,सारथीच्या माध्यमातून आम्ही हक्क मागण्यासाठी आलो होतो. छत्रपती यांचे घराणे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. त्यांचा अपमान कधीही सहन करणार नाही. याच बैठकीला नवाब मालिकांना स्टेजवर बसण्याचा कारण काय? हे सर्व स्टेजवर बसणार आणि आमच्या राजेंना खाली बसवणार. म्हणजे यातून त्यांना काहीतरी घडवायचं होतं, गोंधळच घालायचा होता हे दिसून येतं. सारथी हा विषय त्यांना सोडवायचाच नाही, मराठा समाजाला असच थोपवून ठेवायचा उद्देश होता. पण हा उद्देश मराठा समाज हाणून पडल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेला मराठा समाजाप्रति कधीच आपुलकी नव्हती, त्यांनी सामनातून खिल्ली उडवायचे काम केले. अजित पवार देखील आजतागायत मराठा समाजाच्या बाजूने बोलले नाहीत. मराठा समाजाबद्दल यांना आस्था नाही. मराठा समाजाचा तरुण जगावा की नको, त्यांना नोकरी मिळावी की नको याबद्दल काहीच वाटत नाही. उलट त्यांना फक्त स्वतःचे खिसे भरायचे, बँक बॅलन्स वाढवायचा माहिती आहे, सारथी संस्थेला कधीही भागभांडवल द्यायचं काम ह्यांनी केलं नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली. सारथीला 100 कोटी रुपयांची गरज असताना 6 कोटी देऊन सरकारने काढता पाय घेतला आहे. हे 6 कोटी महाराष्ट्राच्या कोणत्याच जिल्ह्याला पुरेसे नाहीत. त्यामुळे आस्था आणि अभ्यास नसलेले सारथीसाठी काहीच करू शकत नाहीत. मराठा समाज स्वतःच्या पायावर उभा राहावा, म्हणून आमचा मराठा समाज हक्क मागतोय. वडेट्टीवरांची किंमत नाही, त्यामुळे कोणीही त्यांची दाखल घेत नाही. पण सारथीला हात लावला तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा गर्भित इशारा निलेश राणे यांनी दीला आहे. मराठा समाजाकडे 100 टक्के दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मराठ्यांची डोकी गरम झाली आहेत. सरकारने वेळीच आरक्षण आणि सारथी व अन्य मराठा समाजाच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे अन्यथा वणवा पेटायला वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget