वृत्तसंस्था // प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील सर्व मोबाईल व्यावसायिकांनी ओपन, विवो, एमआय, रेडमी, अशा अनेक प्रकारच्या चिनी वस्तु विक्री करु नये अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
सीमेवर जो पर्यंत तणावाचे वातावरण कमी होत नाही तो पर्यंत करमाळा तालुक्यातील सर्व चिनी वस्तुची विक्री थांबवावी व प्रत्येक दुकानावरील चिनी वस्तुचे जाहिरात फलक आठ दिवसात त्वरित काढण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आंदोलन करेल असा इशरा मनसे विद्यार्थी सेना जिल्हा संपर्क अध्यक्ष विजय रोकडे यांनी दिला.
यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख विजय रोकडे, सोलापुर जिल्हा अध्यक्ष सतिश फंड जिल्हा उपाध्यक्ष आनंद मोरे तालुका अध्यक्ष राहुल मंगवडे मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मोरे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे, कविराज माने अदि उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.