पंढरपूर भाजप शहराध्यक्ष संजय वाईकर यांचा कोरोनामुळे मृत्यू


सोलापूर // प्रतिनिधी 
कोरोनाने देशात थैमान घातले आहे. एकीकडे दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत असताना, महाराष्ट्र राज्याला कोरोनाचा सगळ्यात जास्त फटका बसला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत राज्यानं अनेक नेतेमंडळीही गमवली लागली आहेत. यातच आज भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांचे कोरोनामुळे निधन झाले.

संजय वाईकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना वाखरी कोव्हिड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर तेथे उपचार सुरू असतानाच अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी सोलापूरला दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. सोलापूरमधील स्पर्श रुग्णालयात पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 18 जुलै रोजी संजय वाईकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे.संजय वाईकर हे दैनिक निर्भीड आपलं मतचे माजी संपादकही होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget