सोलापूर // प्रतिनिधी
श्रीपुर (ता.माळशिरस) येथील श्रीपुर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डॉ.यशवंत कुलकर्णी यांची तर सचिवपदी संदीप लोणकर यांची निवड झाली. कोरोंनाच्या पार्श्वभूमीमुळे पदग्रहण सोहळा साध्या पद्धतीने घेण्यात आला .
त्यावेळी रोटरी क्लब ऑफ श्रीपुरचे डॉ. हरिचंद्र सावंत-पाटील, डॉ. सुधीर पोफळे, मुकुंद कुलकर्णी, चंद्रकांत भागवत, शंकर यादव, हेमंत बरडे, बाळासाहेब कामते, दत्ता नाईकनवरे, संदीप घाडगे, धनंजय कचरे, डॉ. सुनील फडे, अजित पोखरे, डॉ. प्रमोद पवार, सतीश यादव, शरद पोळ, डॉ. संजय वाळेकर, अमरसिंह पिसाळ-देशमुख, तानाजी भोसले, विनायक पन्हाळे, संजय पाठक, चंद्रशेखर मोकाशी, गणेश कुलकर्णी आदी सदस्य उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ श्रीपुरने दुष्काळात आरो चे पाणी वाटप केले. तसेच मेडिकल कॅम्प, कॉपीमुक्त अभियान, शालेय वस्तूंचे वाटप, महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी कॅम्प, कोरोंनाच्या काळामध्ये हॅन्ड सैनीटायझर मास्क चे वाटप केले. रक्तदान शिबीर आदी क्लबच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवण्यात आले अशी माहिती अध्यक्ष डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी दिली

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.