पंढरपूर // प्रतिनिधी
महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास्थान असलेल्या दादर येथील राजगृह या वास्तमध्ये अज्ञात माथेफिरुकडून झालेल्या तोडफोडीचा शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने जाहीर निषेध अशा शब्दांत शिवबुध्दचे संदिप मुटकुळे निषेध व्यक्त केला असून संबंधितांचा तातडीने शोध घेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.काल सायंकाळी दादर येथील राजगृह तथा आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणास्थान समजल्या जाणा-या राजगृह या वास्तूमध्ये अज्ञात माथेफिरुनी प्रवेश करत तेथील कुंड्या व सीसीटीव्ही कॅमेरे आदींची तोडफोड केली या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून पोलीस संबंधितांचा तपास घेत आहेत.
दरम्यान महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे निवास्थान राजगृह ही महाराष्ट्रातील बाराबलूतेदारांची व आमची अस्मिता आहे.माथेफिरुनी केलेली तोडफोड हा आमच्या अस्मितेवर केलेल्या हल्ला असून या घटनेचा मी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करतो.महाविकास आघाडी सरकारने जातीने लक्ष घालून व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी लक्ष घालून या माथेफिरुना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी.असे शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी असे मत व्यक्त केले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.